एकतर्फी
एकतर्फी
तू माझी झाली नाहीस याचं दुःख नाही, पण मी मरेपर्यंत तुझाच राहिलो, याचा मला अभिमान आहे.
चाकणची सायंकाळ होती. मंद वारा, हलकीशी थंडी आणि सळसळणाऱ्या पानांचा आवाज... छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या गेटवर चंदर एकटाच बसला होता. हातात एक जुनं पुस्तक होतं, पण त्याचे डोळे मात्र समोरच्या रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या गर्दीचा वेध घेत होते.चंदर, नावाप्रमाणेच गंभीर आणि शांत स्वभावाचा. त्याला गर्दीत मिसळण्यापेक्षा स्वतःच्या विचारांच्या गर्दीत रमणे जास्त आवडायचे. त्याचे मित्र त्याला 'बुकी किडा' म्हणायचे, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. त्याच्यासाठी पुस्तके हे फक्त शब्द नव्हते, तर ती त्याला न बोलता खूप काही शिकवणारी आयुष्यभराची सोबती होती.
आज मात्र त्याला पुस्तकात लक्ष लागत नव्हते. एका अनामिक अस्वस्थतेने त्याला घेरले होते. काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं, पण नेमकं काय, हे त्याला उमजत नव्हतं. तो विचारांमध्ये गढलेला असतानाच, एक अल्लड हसू त्याच्या कानावर पडलं. क्षणात त्याने मान वर करून पाहिलं.
ती होती... सुधा.
नावाप्रमाणेच तेजस्वी आणि चैतन्यमय. साधीशी प्रिंटेड कुर्ती, मोकळे केस, आणि डोळ्यांत एक चमक घेऊन ती कॉलेजच्या गेटमधून आत येत होती. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू होतं, जे तिच्या मैत्रिणींशी बोलता बोलता अधिकच खुलत होतं. तिच्या येण्याने जणू त्या सायंकाळच्या वातावरणात एक वेगळाच रंग भरला होता. चंदर तिला पाहतच राहिला. त्या क्षणापासून त्याला समजलं, की आतापर्यंत हरवल्यासारखं वाटणारी गोष्ट कोणती होती!
सुधा पहिल्यांदाच त्याच्या नजरेत इतकी स्पष्टपणे आली होती. याआधी ती अनेकदा कॉलेजमध्ये दिसली होती, पण आज तिचं सौंदर्य त्याला वेगळ्याच रूपात अनुभवायला मिळालं. तिच्या हसण्याने त्याच्या मनात एक अनोखी स्पंदने निर्माण झाली. त्या क्षणापासून चंद्राच्या आयुष्याची दिशा बदलणार होती, हे त्याला तेव्हा माहीत नव्हतं. त्याच्या आयुष्यात सुधा नावाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती, तो तिला पाहतच राहिला, ती मात्र मैत्रिणींसोवे बोलत पुढे निघून गेली. तिच्या पायांचा आवाज, तिच्या हसण्याचा नाद त्याच्या मनात घुमत राहिला. तो दिवस चंदरच्या मनात कायमचा कोरला गेला. कॉलेजचागेट, ती सायंकाळ, तो मंद वारा आणि त्याच्या मनाच्या कोपऱ्यात हळूच रुजलेलं एक कोवळं प्रेम... हे सगळं त्याच्या मनात घर करून बसलं. चंदरचे त्या दिवसा पासून कशात मन लागत नव्हते.
असे करत-करत काही दिवस उलटले. चंदर आणि सुधाची ओळख ग्रंथालयात झाली. सुधाला कविता आवडायच्या आणि चंदरकडे शब्दांचा खजिना होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. कट्ट्यावर बसून चहा पिणे, तासनतास साहित्यावर चर्चा करणे हा त्यांचा नित्यक्रम झाला. चंदरला अनेकदा वाटायचे की तिला सांगावे, "सुधा, तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर कविता आहेस." पण तिचे निर्मळ हसू पाहून तो थांबायचा. त्याला भीती होती की प्रेम व्यक्त केल्यामुळे ही सुंदर मैत्री तुटून जाईल.त्यामुळं चंदर ने त्याच्या मनातील भावना न मांडता त्या त्याच्या मनात तशाच ठेवल्या.
कॉलेजचे शेवटचे वर्ष संपत आले होते. तरीही त्याची सुधाला त्याच्या मनातील गोष्ट सांगता येत नव्हती.पण त्याने कॉलेजच्या शेवटच्या दिवशी आपल्या मनातील गोष्ट सुधाला सांगितली.सुधा त्याला त्यावेळी काही न बोलता निघून गेली. चंदरला त्याच्या मनात सुधाला सांगितल्याचे वाईट वाटू लागले.त्यांनी त्याच्या मनातील गोष्ट सुधाला सांगून आपली चांगली मैत्री तोडली अस त्याला वाटलं.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून कॉलेज पुन्हा सुरु होणार होत,पण चंदरच्या मनातील घालमेल काही बंद झाली नव्हती. त्यानी ठरवलं होत की कॉलेज सुरू झाल्या नंतर तो सुधाची माफी मागणार,आणि तो दिवस उजाडला कॉलेज पुन्हा सुरू झाले.चंदर कॉलेजच्या गेट पाशी उभा राहून सुधाची वाट पाहत होता.सुधा कॉलेजला आली पण तिने चंदरला पाहून न पाहिल्या सारखं केलं.चंदर तिच्या मागे जाऊ लागला पण सुधाची चंदर सोबत बोलायची इच्छा नव्हती.चंदर तिची माफी मागू लागला पण त्याचा काही फायदा झाला नाही.
सुधा त्याला समजू लागली पण तो ऐकत नव्हता.सुधाने त्याला सांगितले की तिच्या मनात त्याच्या बद्दल काही नाही.तीच अमर वर प्रेम आहे.आणि ते दोघे लवकर लग्न करणार आहे.हे ऐकताच चंदरच्या काळजाचा ठोका चुकला.अमर चंदरचा मित्र होता, चंदरला माहीत होत की अमरचे सुधा वर प्रेम नाही तो फक्त शारीरिक गरज भागवण्यासाठी व तिच्या संपत्तीसाठी सुधावर प्रेम असल्याचे नाटक करत होता. चंदर हे सुधाला समजून सांगत होता पण सुधा अमरच्या बोलण्याने पूर्ण पणे भाळून गेली होती.ती चंदरच्या कोणत्याच गोष्टीवर लक्ष देत नव्हती.
शेवट तो दिवस आला,सुधा आणि अमर यांचं लग्न ठरलं. लग्नाची लगबग सुरू झाली. चंदरने एका खऱ्या मित्राची भूमिका निभावली. लग्नाच्या मांडवात त्याने सुधाला हळद लागताना पाहिले, तिच्या हातावर दुसऱ्याच्या नावाची मेहंदी पाहिली. ज्या मुलीवर त्याने जीवापाड प्रेम केले, तिला तो स्वतःच्या हाताने दुसऱ्याच्या स्वाधीन करत होता. कन्यादानाच्या वेळी सुधाचे डोळे पाणावले होते. तिने चंदरकडे पाहिले, तिच्या नजरेत कृतज्ञता होती की दुःख? हे चंदरला उमजले नाही. पाठवणीच्या वेळी जेव्हा तिची गाडी निघून गेली, तेव्हा चंदरच्या काळजाचा एक तुकडा तिच्यासोबत कायमचा निघून गेला.
पुढची ०३-०४ वर्षे चंदरने स्वतःला कामात झोकून दिले. त्याने लग्न केले नाही. अनेक नाती चालून आली, पण त्याच्या मनात सुधाची जागा कोणीच घेऊ शकले नाही.तो तिच्या संसारात कधीच परतला नाही, कारण त्याला तिचे सुख प्रिय होते. पण दरवर्षी तिच्या वाढदिवसाला एका मंदिरात जात असे.
काही वर्षांनंतर गावच्या यात्रेत सुधा आणि चंदर एक मेका समोर आले ,सुधा केस थोडे पांढरे झाले होते, पण डोळ्यांतील तीच चमक अजूनही तशीच होती.दोघेही बराच वेळ शांत उभे राहिले."कसा आहेस चंदर?" तिने विचारले.
"चांगला आहे," त्याने उत्तर दिले.
तिने विचारले, "लग्नाचं काय? घरचं कोणी नाही?"
चंदर शांत राहिला. तेव्हा सुधा डोळ्यांत पाणी आले.
चंदरने विचारलं काय झालं? सुधा त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन रडायला लागली.ती चंदरला सांगत होती की,तू म्हणाला तसा अमर फक्त माझ्या सोबत माझ्या पैश्यासाठी होता.आता त्याचे पहिल्या सारखं माझ्यावर प्रेम नाही राहिले.तो पहिल्या सारखं मला वेळ देत नाय.सतत माझ्या सोबत भांडत असतो.अस म्हणून सुधा पुन्हा रडायला लागली. चंदरने तिची समजूत काढली नाही.त्याला माहीत होत की सध्या सुधाची समजूत काढून काही फायदा नाही,त्यामुळे त्यानी सुधाला मनमोकळे होई पर्यंत रडून दिले. सुधाचे रडणे थांबल्यावर त्यांनी तिला विचारले,आता पुढ काय?सुधा म्हणाली काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे.हे ऐकताच चंदरच्या काळजाचा ठोका चुकला. तो म्हणाला काय? काय बोलतेस हे? तू शुद्धीत आहेस ना? सुधा म्हणाली हो. हा माझा आणि अमरचा निर्णय आहे.मी अजून नाही राहू शकत त्याच्या सोबत.चंदर म्हणाला मी बोलू का अमर सोबत.सुधा काही नाय बोली आणि तिथून निघायला लागली. चंदरचा प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहिला.
दुसऱ्या दिवशी सकाळी चंदर सुधाच्या घरी गेला.त्याला वाटले सुधाच्या घरी जाऊन तिची समजूत काढावी. तो तिच्या घरी जाऊन तिची समजूत काढू लागला,पण सुधा ऐकून घेत नव्हती.तिने निर्णय ठामपणे घेतला होता.कारण घटस्फोट म्हणजे फक्त तिच्यासाठी घटस्फोट नव्हता. तो तिच्या स्वयंवर झालेला वार होता. हे चंदरला लक्षात आले.चंदरला सुधाला फक्त सुखात पाहिच होतं.त्यासाठी तो सर्व काही करायला तयार होता. चंदर जास्त काही न बोलता निघून गेला.त्याला वाटले २- ३ दिवसात सांगेल व्यवस्थित होईल.
पण…. एक दिवस सकाळी आठ वाजता चंदरला सुधाच्या मैत्रिणीचा फोन आला.की सुधाने तीच आयुष्य संपवले.हे ऐकताच चंदरच्या काळजाचा ठोका चुकला.त्याला काय करावे हे कळत नव्हते.तो तिथून निघायला व तिच्या घरी गेला. सुधाला मृत अवस्थेत पाहून त्याचा त्याच्या वरचा ताबा सुटला.सुधाचे अंतिम संस्कार करून तो त्याच्या गावच्या टेकडीवर जाऊन बसला.
आयुष्याच्या त्या संध्याकाळी चंदरला एक गोष्ट उमजली होती. काही गोष्टी अधुऱ्या असल्या तरी त्या पूर्ण असतात. त्याचे प्रेम सुधा ला मिळाले नाही, पण ते त्याच्या मनात कायम जिवंत राहिले.सुधा भले त्याच्यावर प्रेम करत नव्हती.पण त्याचे सुधावर जिवापाड प्रेम होते. सुधाचा मृत्यु झाल्यानंतर चंदर पूर्ण खचला होता.त्याने टोकाचा निर्णय घेतला.त्यांनी सुद्धा त्याचे आयुष्य संपवले.त्यांनी त्याचे आयुष्य संपवणे अगोदर एक पत्र लिहून ठेवले होते.त्यांनी त्या पत्रात लिहिले होते .
की सुधा तू निघून गेलीस आणि माझं जगच थांबलं ग. तुझा घटस्फोट झाला तेव्हा वाटलं होतं की तुला सावरीन, तुला पुन्हा जगायला शिकवीन. पण तुझं दुःख माझ्या प्रेमापेक्षा मोठं ठरलं. लोक म्हणतात एकतर्फी प्रेम सोपं असतं, कारण त्यात दुसऱ्याला हरवण्याची भीती नसते. पण आज तुला कायमचं हरवल्यावर कळतंय की, हे ओझं किती जड आहे. तू तिथे एकटी असशील ना? तुला सोडून जाणं मला जमणार नाही. तू जगाचा निरोप घेतलास, आता मी या श्वासांचा निरोप घेतोय... फक्त तुझ्यासाठी." एवढ लिहून त्याने त्याचं आयुष्य संपवलं.
पण का? चंदरने हा टोकाचा निर्णय का घेतला? सुधाचे चंदरवर प्रेम नव्हते तरी पण का? चंदरला सुधा सोडून दुसऱ्या मुलीवर प्रेम का झाले नाही?
आज असेच बरेच प्रश्न मला पडत आहे.पण या सर्व प्रश्नाची उतरे एकच ते म्हणजे चंदरचे सुधावर असलेले प्रेम. जरी सुधाचे चंदर वर प्रेम नसेल तरी चंदरचे एकतर्फी प्रेम होत.आजच्या या काळात एकतर्फी आणि एकनिष्ठ प्रेम करणारी मुलेमुली फार कमी मिळतात.पण सुधा चंदरच्या प्रेमाला मुकली होती.जर त्यावेळी सुधाने योग्य निर्णय घेतला असता.तर आज दोघेही जिवंत असते.पण आजच्या काळात किती तरी मुली त्यांच्या हट्टापाई जिवापाड प्रेम करणाऱ्या मुलांना गमावतात.तसंच काही सुधाच्या बाबतीत घडले.
"तिचं दुःख मी वाटून घेऊ शकलो नाही, पण तिची सोबत नक्कीच करू शकतो. या जन्मात ती दुसऱ्याची होऊन तुटली, पुढच्या जन्मी ती माझी होऊन भरेल.”
