यशोधरा तू खरी पतिव्रता
यशोधरा तू खरी पतिव्रता
यशोधरा तू खरी पतिव्रता
तू खरी सहचारिणी
दुःख कारण शोधास
अरण्यात गेलेल्या बुध्दानंतर
राजमहाल हिमतीने पेलनारी।
यशोधरा तू खरी पतिव्रता
परिवर्तनाच्या चळवळीची
खरी क्रांतिकारी स्त्री
बुद्धाला परिवर्तनाच्या
चळवळी स्तव मोकळे सोडून
राजमहलात वनवास स्वीकारनारी
तरीही ईतिहासातील बेदखल पात्र
अभिमानाचा नाही
करूनेचा विषय बनलेली
सीता, द्रौपदी, सत्यवानाची सावित्री
या पतिव्रतांमध्ये तुला स्थान नाही
अग कुठे तुझी ती राजमहलातील विरक्ति
अन् कुठे वनवासात सीतेला
झालेला सोनेरी मृगाच्या कातडीचा मोह
खरचं स्त्रीयांनी तुझाच आदर्श घ्यावा
यशोधरा तू खरी पतिव्रता
बारा वर्षांनी तथागताला
सामोरी जाणारी विरहिणी
पुत्राला पित्याकडे धनासाठी नव्हे
तर त्याच तेज मागन्यासाठी
पाठविणारी पहिली स्त्री
यशोधरा तू खरी पतिव्रता
पतीला अप्रत्यक्ष सहाय्य करणारी
तर् भिक्षुणी बनून मानवमुक्ती मार्ग स्विकारणारी
धम्मप्रचारास सिध्द झालेल्या बुध्दाला
धम्मचळवळीस सहाय्य करणारी
यशोधरा तू खरी पतिव्रता
