योगी
योगी
योगी तुझी पायवाट ही
लागो घराला हो धन्य
उत्तर दिशा ,बोलू लागली
तू यावा, कोणी न यावा अन्य
झाडवेली ही डोलू लागती
पक्षी करी किलबिलाट
काळोख दुर सारूनी तो
सूर्य ही झाला बलाढ्य
योगिनीचे मन जाणया
प्रश्न ही उत्तरास लाजेल
क्षणोक्षणो तपला तू योगी
असत्य कंटाळून भागेल
तू येताच ,गतजन्माचे
दर्शन मजला झाले.
जसे परलोकातून उतरून
देव माझ्या घरी आले
जीवन सारे निद्रेत ग्रासले
स्वप्न कोडे मज सुटेना
थांबून होते वळणावरी या
वाट काही ती सापडेना
वसंत आले गेले कित्तेक
रत्नाचे झाले न घर्षण
तपून कित्तेक दिवसाला
सत्याचे नव्हते झाले दर्शन
वाऱ्यासंगे माती धावावी
डोळ्यात जसे अंजन
नभाचे ते कित्तेक रुपडे
धो-धो पडला झाले गुंजन
टाळ ते चित्ताचे क्षमता
एकाग्र होते योगी मन
विचार धारा थांबवून त्या
स्थिरता पायी तन
मृत भावना यावेळी मग
मनात घेऊ लागे उभारी
मार-येऊन समोर नेहमी
छळू लागे जसा भर दुपारी
संयम इथेच जर कायम राहिला
संत करितो पारमिता पार
कठोर प्रयत्ना अंती
मिळतेच ब्रम्हचर्याचे सार
शक्तिचे व्दोतक प्रेम निर्मळ
कोणी करते त्याची चेष्टा
इंद्रिय, कामनावर ताबा ज्याचा
नाही ढळू शकत तो द्रष्टा
