STORYMIRROR

Vinayak Patil

Others

3  

Vinayak Patil

Others

व्योमगंगा

व्योमगंगा

1 min
14.9K


ओळखेना कोण आता कोणत्या वेषात आहे

मुखवटे घालून जो तो मतलबी कोशात आहे

हो अता करणार नाही भरवसा या माणसावर

वार ही पाठीवरी मी सोसला प्रेमात आहे

कायद्याच्या गाढवाला पोसते जनता उपाशी

मात्र काठी ह्या पुढाऱ्यांच्या सधन हातात आहे

धाक भय नाहीच आता माणसाच्या वासनेला

आंधळीशी भूक दडली का अशी पोटात आहे

जाळले मी पीक जे पाण्याविना वाळून गेले

काळजाची राख माझ्या विखुरली शेतात आहे

दावणीला बांधली दुभत्या म्हशीगत रयत यांनी  

दूध नेते भोगती अन रेडकू रोगात आहे

लोकशाही होत गेली लांडग्यांची स्वार्थशाही

देश मतपेढ्या करोनी वाटला का जात आहे  

 


Rate this content
Log in