STORYMIRROR

Vinayak Patil

Others

2  

Vinayak Patil

Others

देवप्रिय

देवप्रिय

1 min
14.3K


 

बहरते आयुष्य माझे तू अशी हसता क्षणी

धावते काळीज वेगे तू मला बघता क्षणी

सोडवेना या मिठीला शपथ कोणी घातली

जीव माझा धुंदला तू पाकळ्या मिटल्या क्षणी

चांदण्या रात्री साऱ्या स्पंदल्या माझ्या उरी

स्पर्श तो अंगास भासे तू मला स्मरता क्षणी

ओठ दे ओठात अलगद प्रेम मदिरा चाखण्या        

लुब्ध ह्या डोळ्यात उतरे कैफ ती चढता क्षणी

या व्यथा माझ्या मला रे, सांग का वाटू तुला?

जाळले पण टाळले मन मी मला कळता क्षणी

पापण्यांनी पापण्यांना वचन होते हे दिले

एक अश्रू ही कुणा कळणार ना झरता क्षणी

मी अता माझे मला हे शेवटी समजावतो

प्रेम असते आग, उरते राख ते जळता क्षणी

 


Rate this content
Log in