Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vinayak Patil

Others

3  

Vinayak Patil

Others

सौदामिनी

सौदामिनी

1 min
6.8K


मला गोड काही तुला द्यायचे

तुझे गोड काही मला घ्यायचे

कसा जीव विरहात जाळू प्रिये

कधी एकदा सांग भेटायचे

कसे ते ऋतू लुप्त झाले सखे

किती प्रेम नुसते उतू जायचे

असे ही कधी होत नाही अता

तुझे भास फसवून हसवायचे

तुझ्या पापण्या चुंबता चुंबता  

तुझे गाल लाजेत रंगायचे

तुझे ओठ ओठांत घेता क्षणी

कसे अंतरी मोर नाचायचे

अता थांबले गीत संगीत ही

किती राग हृदयात गुंजायचे  

तुझ्या काकणांच्या निनादात ही

सुखाचे किती स्वर उमटायचे

कसे हाकलू मी मनाच्या नभी

तुझ्या आठवांचे थवे यायचे  

 


Rate this content
Log in