STORYMIRROR

Vinayak Patil

Others

3  

Vinayak Patil

Others

हिरण्यकेशी

हिरण्यकेशी

1 min
14.4K


जगायचे राहिलेच माझे वितर्क जर-तर अता कशाला

घडायचे ते घडून गेले उगाच मर-मर अता कशाला

उद्या उद्यावर ढकलत सारी हयात संपून व्यर्थ गेली

अपयश येता खचून वदलो करीन नंतर अता कशाला

प्रपंच काही पराभवांचे मनात माझ्या चुकचुकती का

उनाड जगल्या खुळ्या मनाला नवीन पाझर अता कशाला

हव्या हव्याशा अनेक गोष्टी तुलाच पाहून त्यागल्या रे

कधी तरी भेट बोल "बाबा" वरवर आदर अता कशाला

विवाद संपव सरून जाते क्षणा क्षणाने सबंध जीवन        

मिटून घेऊ मिठीत ये आपल्यात अंतर अता कशाला

भुलून नाही कधीच गेलो लबाड ढोंगी जमाव झाला

लढीन जोवर अखेर तोवर खऱ्यास झालर अता कशाला

कणा कणाने विणून होते हिमालयावर अथांग चादर

लहान कण ही महान होतो कृतीस अडसर अता कशाला

 


Rate this content
Log in