STORYMIRROR

Vinayak Patil

Others

3  

Vinayak Patil

Others

चांदणे

चांदणे

1 min
27.3K


सांग मोगऱ्यात तू गंध ओतलास का

धवल त्या फुलातला रंग प्राशलास का

चांदणे नभातले व्यापले मनात या

सांग आंधळा असा छंद लावलास का

सांग आवरू कसे वादळास या इथे

गर्द कुंतलातला चाप काढलास का

सांज आज का अशी एकटीच भासते

तू जवळ असूनही स्पर्श टाळलास का

गझल आपली पुन्हा गायलो मिठीत मी

शब्द शब्द बहरता ओठ चुंबलास का

हो मला तुझी अता जाहली सवय कशी

एकदा कधी असा विरह सोसलास का

सांग आज का मला शपथ घातलीस तू

डाव मांडलास पण आज मोडलास का

 


Rate this content
Log in