STORYMIRROR

Vinayak Patil

Others

3  

Vinayak Patil

Others

फास

फास

1 min
14.6K


मी सूर काळजाचे आतून लावलेले

गझलेत गायलो ते सारेच झोंबलेले

ते दुःख आपल्यांचे सलले असे पुन्हा की

श्वासातले निखारे शब्दात पेटलेले

मी जाणले असे की समजून तोच घेतो

ज्याचे गहाण असते काळीज ठेवलेले

मी पाहिले कुणाला सरणात बोलताना

वाटून खा अता जे फासात भेटलेले

हा जन्म ही इथे का कर्जात संपला रे

जगणेच शाप माझे ओलीस ठेवलेले

माझे मला कसे हे ओझेच पेलवेना

फासात लोंबल्यावर हे प्रेत हासलेले

माती व पावसाचा होता तलाक झाला

नाही मला कुणाचे आधार लाभलेले

नाहीच काेण आले जेव्हा उपास झाला

मेल्यावरी मढ्याला सारे चटावलेले

खोटी सहानुभूती जखमेस मीठ चोळी

गद्दार माणसांचे सरकार माजलेले

 


Rate this content
Log in