STORYMIRROR

Vinayak Patil

Others

3  

Vinayak Patil

Others

मन

मन

1 min
13.6K


मन माझे ऐकत नाही

हे अंतर संपत नाही

ह्या गिरक्या एका जागी

मी फिरतो सरकत नाही

भासांची भुते छळता

ती गेली वाटत नाही 

मरणाची संधी सुद्धा  

का आधी भेटत नाही

मायेची उब विझल्यावर  

गारठलो पेटत नाही

जगण्याचे वंगण सरता

कुरकुरतो एेपत नाही

रथ माझा शापित फसला

हे चाकच उचलत नाही

कुबड्यांनी आठवणींच्या

लंगडतो चालत नाही

 


Rate this content
Log in