आनंदकंद
आनंदकंद
1 min
596
माझ्याच आर्जवांना सांगू कसे कळेना
शब्दात लक्तरांना मांडू कसे कळेना
सारे खवाटलेले चंगळ सुसाटलेले
साऱ्या भ्रष्ट बुडाला गाडू कसे कळेना
सारेच रोज येथे घालून मुखवट्याला
माझा नि कोण परका चाळू कसे कळेना
कोणास काय पडले आहे इथे कुणाचे
टाळून भावनांना वागू कसे कळेना
ह्याच्या घरातली हा गल्लीत घाण फेकी
दिल्लीस दोष देती भोंदू कसे कळेना
अवतार कोण घेतो सारी हयात देतो
स्वार्थात चित्र त्यांचे टांगू कसे कळेना
स्वातंत्र पाहिजे पण कर्तव्य का रूचेना
आदर्श जीवनाला पाळू कसे कळेना
