वटपौर्णिमा
वटपौर्णिमा
1 min
14.2K
सात जन्माच काय
घेवून बसला
या जन्मी तरी हाच
पती हवाय का आपल्याला॥१॥
परंपरा म्हणून
पुजेचे ताट घेऊन
नटून थटून
जातो अंगभर
दागिने घालून॥२॥
वडाला फेर्या मारायच्या
प्रदक्षिणा घालायची
पूजाअर्चा करायची
हाच नवरा मिळू दे
याचना करायची ॥३॥
रोज भांडणे होतात
मने दुखावली जातात
खरंंच हवाय का पती?
जो आहे लखपती..॥४॥
वडाखाली का जायचे?
प्राणवायू मिळतो त्यासाठी
आनंदी, निरोगी जीवनासाठी
परंपरा जपण्यासाठी ॥५॥
