वसुंधरेचे सौंदर्य
वसुंधरेचे सौंदर्य


निसर्गाचे ऋतू परिवर्तन होत असतं
ऋतुनुसार सृष्टी वेगळे पेहराव करते
या सर्वांत पावसाळ्यात धराचे सौंदर्य
नव वधू समान हिरव्या साजाने नटते.
मृग नक्षत्राने रिमझिम पाऊस पडतो
ओल्या मातीचा सुगंध दरवळतो
इवले इवले कोंब उमटती धरा उदरी
बळी राजा ही पेरणी करण्या राबतो.
वसुंधरा हिरव्या हिरवाईने उमलते
हिरव्या शालू प्रमाणे ती नव युवती
नखशिखात पाचूच्या दागिन्यांनी
नटल्यावर नव वधूच भासती.
हिरव्या हिरव्या डोंगर दऱ्यातुनी
दुधाळ झरे वाहुनी धबधबा बनती
दृष्य ते पाहुनी डोळ्यांचे पारणे फिटे
नदी नाले भरुनी पाणीच पाणी दिसती.
ऋतू पावसाळा धन धान्य पिकवण्याचा
जगाचा पोशिंदा लागतो शेती कामाला
साऱ्या वसुंधरेचे हिरवे रूप मोहकते
मनाला अन् हर्षविते प्रत्येक माणसाला.