वसुंधरा
वसुंधरा
1 min
268
वसुंधरा
मातीचं उबटन
काळ्या सोन्याचं लेणं
मातीत जगणं मातीत मरणं
वसुंधरा
प्राणवायूचा आगर
सजीवांचा जीवांचा जागर
नीती मूल्यांची सुखाची घागर
वसुंधरा
पोटाशी धरते
जन्म मृत्यूला कवटाळते
सारी माझीच लेकरे सांगते
वसुंधरा
थकून गेली
ओझ्याखाली वाकून गेली
वृक्षतोडीच्या कत्तलीने संपत आली
करा
पाण्याचे संवर्धन
राखुया समतोल निसर्गाची
थांबवूया धूप हळहळत्या जमिनीची
टाळूया
वापर प्लास्टिकचा
स्वच्छ समुद्र नदीनाला
मुकी जनावरे मुकती प्राणाला
वीर
जवानांची भूमी
मातृभू रक्षणार्थ लढती
प्राणांची आहुती वसुंधरेस अर्पिती