STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

4  

.प्रमोद घाटोळ

Others

वसंत

वसंत

1 min
359


वसंत


कळले नाही प्रेम कुणाला

परि अंतरी दुजे न बसले

हे नाते असले कसले


ज्यांना मी माझे म्हणालो

ते क्षणाक्षणाला डसले

माझे मनोरथ फसले...


हृदयावरती घाव उमटले

त्यातही तेच दिसले

आपुलाचा तो चेहरा बघता

रुसून अश्रू हसले...


भाव असाच हा चालत आला

युगं अंतरली किती

सांगा मग कुठून आली

असली वेडी प्रीती

उत्तर कुणा न गवसले...


बाप ऋतू वसंत घरचा

आसवे त्याचे न कुणी पुसले

पत्त्याचा हा खेळ संपला

उगाच कुणी मुसमुसले...


Rate this content
Log in