STORYMIRROR

Sunita Ghule

Others

3  

Sunita Ghule

Others

वसंत फुलला

वसंत फुलला

1 min
1.4K


ऋतू वसंत फुलला

फुटे धुमारे आशेला

मोहराच्या सुगंधाने

आंबा रानी बहरला।


ऋतुराज वसंतात

नवी नव्हाळी पानांला

कोकीळेच्या कुंजनाने

प्रेमरंग जागा झाला।


वृक्ष पळस, पांगारा

ज्योत पेटली सावरी

लाल,केशरी गुलाबी

घोस बहावा आवरी।


नानाविध रूपांतुनी

रंग उधळी निसर्ग

भारद्वाज गातो गीत

सज्ज स्वागताला स्वर्ग।


मनी गंध चांदण्यांची

बरसात वसंतास

आनंदाच्या फुलोऱ्याने

कडुनिंबा मधुवास।


जीवनाचे हा प्रतिक

जादू चराचरावर

आसमंत गुंगवतो

मदनाचा ऐन भर।



Rate this content
Log in