*वृक्षमाया*
*वृक्षमाया*
1 min
13.8K
देती छाया
वृक्ष करिती माया
पशू,पक्षी,प्राण्यांवर
पक्षी येती
विसावा घेती
डौलदार वृक्षावर
माकडे येती
झोका घेती
वृक्षांच्या फांदीवर
मुले येती
वृक्षाखाली खेळती
बाळे ही छान रमती
कष्टकरी माय येती
घडीभर विसावा घेती
वृक्षाच्या छायेत
स्नेहभोजन ती करती
उन्हातान्हात पशू येती
वृक्षाच्या छायेला
छायेतुनी ती तृप्त
होवूनी जाती
अबालवृद्ध येती
गप्पात रममाण होती
दिनभराचा थकवा
संध्येला ती विसरती
बाळ बालेचे रडती
बाला झोका फांदीला टांगती
झोका देताच बाळ
रडणे आपले थांबविती
असा हा वृक्ष करी
सर्वांवर माया
पावसाळ्यात वृक्षाची होती
हिरवीगार काया
