वृद्धाश्रम
वृद्धाश्रम
1 min
12.1K
का कोणी केली सुरवात अश्या आश्रमाची
जिथे मिळते वृद्धांना परक्याकडून हात
आधाराचा आणी साथ आसऱ्याची
जिथे आपलीच लोक परक्याच्या स्वाधीन करता
कोण काढणार कटकट असे ही म्हणतात
तो आश्रम बेघरांसाठी झाला प्रसिद्ध
आपले असून नाही कोणी भेटायला येत
आसुसलेले डोळे असतात त्याचे आपुलकीसाठी
वाट पाहत असतात ते आपल्या माणसासाठी
कधीही न येवो भविष्यात परिस्थती
कि घराची संख्ये पेक्षा वृद्धाश्रम वाढतील
