वृद्धाश्रम
वृद्धाश्रम
1 min
746
नको दाऊ
बाळा वृद्धाश्रमाची वाट
अश्रू दाट
नयनी.
नव मास
वाहिला तुझा भार
अडचण अपार
माझीच.
राहू दे
मला तुझ्याच घरी
पडेन खाटेवरी
कोपऱ्यात.
आई म्हणुनि
ओळख ना सांगणार
नाही मागणार
पैसाअडका.
कळेना मज
समजूत कशी काढू?
नकोस धाडू
वृद्धाश्रमी.
