Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Medha Desai

Inspirational

4  

Medha Desai

Inspirational

वंदन देश सेवकांना

वंदन देश सेवकांना

1 min
22.7Kत्रिवार वंदन अशा देश सेवकांना

माणसातील देवत्व नसानसात भरलेले

अविरत देश रक्षणासाठी झगडून

तेजस्वी मानवतेचे दर्शन घडवलेले १


आपला सच्चा शूरवीर 'पोलीस' शिपाई

कर्तव्याला जागणारा,खरा मित्र समाजाचा

सण,उत्सवातही कार्यतत्पर, जागरूक

कायद्याचा सेवक,शत्रू अत्याचार, अन्यायाचा २


स्वतःच्या जीवाची कधीही पर्वा न करता

दुसऱ्याला,रुग्णाला आधी नवा जन्म देणारा

रात्रंदिवस रुग्णांची तपासणी,सेवा करून

'डाॅक्टर' मानवतेचे दर्शन घडवणारा ३


रुग्णांच्या सेवेतच स्वतःला वाहून घेणारी

'परिचारिका'दवाखानाच आपले घर मानणारी

सदा डाॅक्टरांच्या हाताखाली वावरणारी

हसतमुखाने रुग्णांची सेवा मायेने करणारी ४


स्वच्छतेचे पुजारी 'सफाई कामगार'

घाणीच्या साम्राज्याला चमक आणतात

सर्वांचा मान राखून दवाखाना, रस्ते झाडतात

कसलीही कीळस न करता सफाई करतात ५


अशा सच्च्या,खर्या देश सेवकांना

मानाचा मुजरा करून सविनय नमस्कार

आपल्या कार्यतत्परतेने नवजीवन देणाऱ्यांचा

माणुसकी,आपुलकी, सेवादानाचा दिव्य साक्षात्कार ६


Rate this content
Log in