वळणं
वळणं
1 min
28.5K
वळणं येत गेली मी वळत गेलो
नको त्या मार्गावर नकळत गेलो
करू नको गवगवा चंद्र मिळाल्याचा
त्यासाठी तर मीच मावळत गेलो
तुझी मशाल अजूनही पेटलेली
तू जाळत गेला मी जळत गेलो
मला नव्हती चिंता माझ्या बदनामीची
मी तुमचीच इज्जत सांभाळत गेलो
ती माणसे ते दिवस अवसेचे
पण त्यांनाही मी ओवाळत गेलो
