विसर...!
विसर...!
1 min
519
विसर..!
गप्पांच्या नादात
तुला विसरलो
पण तू
दत्त म्हणून पुढे उभा
चमकलो मी
आणि आठवण झाली
हात जोडले
आणि नमस्कार केला
असू दे अस होत
कधी कधी
उद्या भेटतो
पुन्हा सकाळी म्हंटले
आणि पुन्हा त्याला
नमस्कार केला....!
