STORYMIRROR

Prajakta Vetal

Others

2.9  

Prajakta Vetal

Others

विश्वएकता गीत

विश्वएकता गीत

1 min
27.6K


 अभिमान हा रोमरोमातूनी प्रकटावा

 क्षितीज्यापल्याड ध्वज विजयाचा उंचवा मानवा,

क्षितीज्यापल्लयाड ध्वज विजयाचा उंचवा ||धु||

 ना जात श्रेष्ठ, ना वंश श्रेष्ठ 

 ना गोरा महान, ना काळा महान

 स्त्री-पुरूष दोघेही आहेत एकमेकांचा आधार

 मानवतावाद खरा मनी जागवा ||१|| 

नको दहशतवाद, नको आतंकवाद

का आखाव्या रेषा परकेपणाच्या

जर एकच सूर्य देतो येथे

जीवनदान सर्वांना...

जर एकच पोषणकर्ती आपुली

धरणीमाता... 

असो पौर्वात्य,असो पाश्चात्य 

मनामनातुनी एकतेचा सूर उमटवा ||२||  

नको पर्यावरणाची हानी

वृक्षवल्ली पशुपाखरे,सारे आपुलेच सगेसोयरे 

ही जाण राहू दे मनी,धरुनी कास विज्ञानाची

नसनसात भिनावी नशा मानवीमुल्यांची

जरी वेगळी भाषा, जरी वेगळी संस्कृती

गाऊनी गीत मानवतेचे...

अंतरात आपुल्या माणूसपणाची जाण जागवा ||३||

 


Rate this content
Log in