विरक्ती
विरक्ती
1 min
206
मनी माजला कल्लोळ
उद्रेक झाला विचारांचा
जन्माचा मूळ समजता
दूर झाल्या संसाराच्या वाटा
विरक्ती आली प्रपंचाची
वाट स्वीकारली परमार्थाची
साहित्यसेवा ही वाट श्रेष्ठ
काया झिजवली त्यासाठी
माझी काया न माझी
झाली मी परमेश्वराची
या संसारात पुन्हा न येणे
हे ईश्वरा हेच आता मागणे