विरक्त
विरक्त
आसवांचे सुख
पाहवया नेत्र माझे
आतुरले.
फोडूनिया बांध सारे
आसवांना आसवांनी
गाठले.
पाहुनिया तहान
धरतीची आकाश ही
हे फाटले .
सोसुनिया भार
ढगांचा ते ही थोडे
वाकले.
पक्षांची ती पाहून
उन्हात किलबील
काळीज हे फाटले.
शोधीत पाणी दमती
पंखातील जीव
समुद्र का ते आज
आटले.
तोडुनाया सारे जंगल
आज वृक्ष कोठे
सापडे?
ऊनवारा,पाऊसधारा,
निसर्ग मारा कोण
आता आडवे?
भूक ज्याची-त्याची
झाली मोठी
आता कोण कोणास
सापडे?
अर्थ देऊन स्वार्थ
काढणे हेच ज्याचे त्याचे झाले आता
मागणे.
ह्या जगात नाही
कोण कोणाचे
हे मी आता
जाणले.
सोसुनिया घाव सारे
मी आता जनांना
जाणले.
