दोस्ती
दोस्ती
1 min
13.9K
दोस्ती आपली न्यारी,
जिवाभावाची प्यारी
विसरुन सारी दुनियादारी,
आपली यारी सगळ्यात भारी
जरी नसलो आपण
एका रक्ताचे, तरी
मित्र आहोत हक्काचे
जरी होत नसली
आपली रोज भेट,
तरी कधी नाही केला
एकमेकांच्या हाकेला वेट
सुख-दुःखां मध्ये
एकमेकांच्या होऊन
सहभागी, उभे
राहिलो पाठीशी
सोडून जरी कधी
गेली रक्ताची नाती,
तरी चोरून का होईना
भेटून जिवंत ठेवतील
मैत्रीची नाती
