!! कसा भेटलं विठ्ठल !!
!! कसा भेटलं विठ्ठल !!
कधी नाही बोलला
मुखी हरिपाठ,
कधी नाही लिहला
कोणता अभंग ,सांगा
कसा भेटेलं विठ्ठल,
कसा भेटेल विठ्ठल !!
कधी नाही झालो
भजनात दंग,कधी
नाही घेतला हाती
टाळ मृदुंग, सांगा
कसा भेटेल विठ्ठल
कसा भेटेल विठ्ठल !!
कधी नाही लावाला
कपाळी अष्टीगंध,
कधी नाही जपला
विठ्ठल नामाचा मंत्र,
कसा भेटल विठ्ठल
कसा भेटल विठ्ठल !!
कधी नाही धरला
उपवास,कधी नाही
केला पांडुरंगाचा हट्टास
सांगा कसा भेटल विठ्ठल
कसा भेटल विठ्ठल !!
कधी नाही फिरलो
पंढरीत,कधी नाही
रामलो संत सज्जनात,
सांगा कसा भेटल
विठ्ठल कसा भेटल
विठ्ठल !!
कधी नाही केला
दानधर्म,कधी नाही
केला निटनेटका प्रपंच
सांगा कसा भेटल
विठ्ठल कसा भेटल
विठ्ठल !!
