अहिल्या
अहिल्या
1 min
16.8K
धनगर जातीत जन्माली
अशी पुण्यश्लोक अहिल्या
झालीस तू
होळकर घराण्याची राखून
शान राजघराण्याच करून
मोठं नाव प्रजाहित
दक्ष अहिल्या
झालीस तू
छत्रपतींच्या स्वराज्याचा
राखून मान मराठे
शाहीची अस्मिता
अहिल्या झालीस तू
गोर-गरिब जनतेला देऊन
न्याय न्यायाची देवता
अहिल्या झालीस तू
स्त्री उद्धाराचा घेऊन
ध्यास स्त्री शक्ती
अहिल्या झालीस तू
ईग्रंजाना तलवारीचा
दाखवून धाक प्रजेसाठी
डोळ्याची करून वात
देवी अहिल्या
झालीस तू
