!! लेखनी तू माझी !!
!! लेखनी तू माझी !!
1 min
14.1K
लेखनी तू माझी
का एकटीच
बडबडली !!
मुक्या कागदावर ओडून
घाव का एकटीच
फडफडली !!
अन्यायाला फोडाया
वाचातू तू कधी
नाही घाबरली !!
लपून-छपून न करता
घाव तू पहिल्या
पानावर झळकली !!
सत्याची तू मांडून
बाजू कधी नाही
डगमगली !!
काळ्याकुट्ट अंधारात
न्यायाला दाखवून वाट
अन्यायावर तू कडकडली !!
सत्कार्याचा घेऊन
पुढाकार बातमी
सर्वत्र तू पोहचवली !!
प्रकल्प योजनां मध्ये
घेऊन भाग वाट
त्यांना दाखवली !!
