दुष्काळ
दुष्काळ
1 min
13.8K
रानं-वनं गेली जळून
करपली पानं,डोईवर
नाचतोया हा कोरडा
दुष्काळ
नदी-नलं गेल अटून
आडवा पडला विजेचा
खांब,घशाला पडली
कोरड कधी भागेल
काळ्या मातीची तहान
काळजाचं पाणी करूनी
बाप पिकवतो हिरवं
सपानं,मन मारूनीया
माय रोज उपाशीच नीजं
माल घेऊनी शेताचा
बाप बसतो ऊन्हात
भाव बघुनी कष्टाचा
घाम फुटतो मनात
कर्ज-पाणी काढून
वजन वाढंल रे
सातबार्याचं,डोळ्याला
येता जाग रोज
सावकार दारात
किती वाढला ताण
डीईवर तरी हसतो
मुखात, मुला-बाळांना
बळी राजा तरी
ठेवतो सुखात
