!! वारकरी !!
!! वारकरी !!
चालला हो चालला
वारकरी चालला
घेऊनिया हाती विणा,
म्रुदुंग टाळकरी चालला !!
सोडूनिया घरदार,
मोह-माया पार-प्रपंच
सारा, मुखी घेत
हरी नाम चाले
माळकरी माझा !!
एक-सुर,एक-ताल
कपाळी हो अष्टगंध,
वारकरी चाले मुखी
विठू नामाचा एक छंद !!
विसरुनिया भुक-तहान
वाट पंढरीची चाले,
ज्ञाना,तुका पालाखीला
गर्दी ही साजे !!
विसरुनिया जात-
पात वारकरी एका
विठ्ठलं रंगात दंगला,
आषाढीला इंद्रायानी
काठी विठ्ठलं भेटीचा
सोहळा रंगला !!
नाहुनिया इंद्रायणीत
वाराकरी मोक्ष तितेच
पावला,ठेऊनिया
हात कटेवरी,उभा
विटेवरी असा सावळा
विठ्ठलं पाहियेला !!
