विरह
विरह
1 min
3.2K
प्रिये पाहा ना आज
किती निष्ठुर वेळ
झाली
तू तिथे अन् मी
इथे कोठेच मेळ
नाही
सोडून तुला जाताना
पावले, ती माझी
मंदावली
पाहिले मागे वळून
जेव्हा तुला, छाया
ही तुझी धुंदावली
भेटेन म्हटले पुन्हा
कधी तुला, आता
लवकर भेट नाही
आहेस तू माझ्या
मनात, नुसता नजरेचा
तो भास नाही
निघुन जतील हेही
दिवस आता, मागे
वळून पाहण्यास वेळ
नाही
संपून जाईल हा
विरह तुझा-माझा,
आपले प्रेम हा
कोणता खेळ नाही!
