ह्या जगात जरी नसलो मी
ह्या जगात जरी नसलो मी
ह्या जगात जरी
नसलो मी तरी
तुझ्या पशीच राहीन
मी, जरी नसलो मी माझ्यात
तरी तुझ्यात राहीन मी!
ह्या जगात जरी
नसलो मी तरी
तुझ्या पशीच राहीन
मी, पडत नसली
जरी सावली माझी,
तरी तुझ्या सावलीत
राहीन मी!
ह्या जगात जरी
नसलो मी तरी
तुझ्या पशीच राहीन
मी, तुझ्या नजरेत
नसलो मी तरी
तुझ्या स्वप्नात राहीन मी!
ह्या जगात जरी
नसलो मी तरी
तुझ्या पशीच राहीन
मी, कधी होऊनी
श्वास तुझा तुझ्या
जिवात राहीन मी!
ह्या जगात जरी
नसलो मी तरी
तुझ्या पशीच राहीन
मी, कधी रडलीस
माझ्या आठवणीत तू
तर तुझ्या डोळ्यातून
आश्रू होऊन वाहीन मी!
ह्या जगात जरी
नसलो मी तरी
तुझ्या पाशीच राहीन
मी, कधी विसरून
गेलीस जरी तू
मला तरी तुला
नावात जिवंत राहीन मी!
