विनवणी...!
विनवणी...!
बातमी पाहिली दुष्काळाची
इच्छाच मेली सुकाळाची
पाणी वाटपावर सारा गाव जमला
येथे कोणता धर्म जपला
सारे जहासें अच्छा
हिंदोस्ता हमारा म्हणता म्हणता
रस्त्यावरून तडक निघाली
पाण्यात जनता
वाईट वाटले कवी मन माझे
क्षणातच बाबा हेलावले
वरुणाला मी तात्काळ मग
विनाविलंब बोलावले
जाब विचारला त्याला
काय चाललेत रे तुझे नखरे
कशास सांग सोसाय लावतोस
उन्हाचे धगधगते निखारे
चारा पाणी काही नाही
जगायचे तरी सांग कसे
जमत नसेल तर राजीनामा दे
नाहीतर मनसोक्त आता बाबा पाणी दे
हादरला घाबरला शरमला
माझा धाकच त्याला वाटला मोठा
स्वप्नी होता हातात सोटा
पाऊस खरेच की आला मोठा.....!
