वीस मे(20)
वीस मे(20)

1 min

11.8K
चौथा लॉक डाऊन
तिसरा दिवस खूप छान...!
ती न तेरा झाले जीवनाचे
स रसकट सारेच फरफटले
रा तोरात सारे जीवनच
दि सता दिसता बदलून गेले...
व ळचणीचे सारे रुबाब
स रसर नेस्तनाभूत झाले
खु पले ऐश्वर्य क्षणात
प श्चाताप दग्ध झाले...
छा टणी अहंकाराची झाली
न कळत मानवजात जमिनीवर आली
मी मी म्हणणाऱ्यांची सुद्धा
या महामारीने चांगलीच जीरवली...
मी चा मी पणा लयास जाता
मानवाचा प्रेमभाव उदयास आला
सारे आपलेच आता तो
लीलया जाणू लागला...
पटले देवा तुझी
करणी अगाध आहे
तुझी लीला अपरंपार
हेच सत्य आहे....!