विहार....!
विहार....!
गाढ झोपेच्या स्वप्नात
मी आकाशात उडत होतो
हात मारीन तसा
वर उंच उंच झेपावत होतो
वरून सारी श्रुष्टी
सौन्दर्याची दृश्य टिपत होतो
मनो मनीच आनंदी
होत होतो
अचानक एक छोटा
उनाड ढग डोक्यावर आला
आणि मायेचा कोंड्या पावसाचा
भर उन्हात शिडकावा करू लागला
मंद आल्हाददायक वारा
अंगास हळुवार स्पर्षत होता
उन्हात इंद्रधनुष्याचा धनुष्य
आकाशी साकारत होता
पहाडी हिरव्या गार धरतीवर
निरभ्र मोकळ्या आवकाशात
मी दोन सप्तरंगी इंद्रधनुष्यात
मोकळा चाकळा मंत्रमुग्ध स्थिरावतो
किती सुंदर अवस्था माझी
कायमची गोड भासणारी
आणि स्वप्नात सुद्धा ती मला
हवी हवीशी वाटणारी.....!
