STORYMIRROR

Trupti Naware

Others

4  

Trupti Naware

Others

विद्यार्थी

विद्यार्थी

1 min
27.4K


रोज अभ्यास

रोज रोज शाळा

रोजचाच गृहपाठ नि

रोजच्याच स्पर्धा ..

कंटाळा आलाय मला

कुणी बदलेल का या वेळा..

मला उडावेसे वाटतेय

पंख द्या ना मला..

त्याच त्याच विषयात

एकच असतो सल्ला 

किती संस्कारी व्हायचे

करु द्या ना थोडा कल्ला..

लिहुन लिहुन हात दुखतो

वाचून वाचून डोकं ..

तरीही मार्क कमी पडतात

विचारहीन असत खोकं..

थोडी मौज,थोडी मजा

वर्गातला दंगा टिचरची सजा

आईचा ही मिळतो तेव्हा रट्टा

प्रश्न करते ती देवाला..

"सुधरेल का हा पठ्ठा"?

रोज रोज अभ्यास

रोज रोज शाळा..

मोठ्ठ व्हायचयं मला..

कुणी शिक्षक बनवा मला

पण यासाठी तर शाळेत

जावे लागेल...

यासाठी तर अभ्यास 

करावा लागेल...

नको ती शाळा

नको तो अभ्यास

जगावसं वाटतय

बंधनापलीकडे..

नुसतच अनुकरण 

करुनही घडतोय

विद्यार्थी अलीकडे !!!.


Rate this content
Log in