!! विद्यार्थी !!
!! विद्यार्थी !!
1 min
16.9K
परिस्थितीची जाण ठेव,
वडिलधाऱ्यांचा मान ठेव,
विद्यार्थी आहेस तु
ह्याच थोडं भान ठेव !!
शिक्षणाचा ध्यास ठेव,
शिकण्याचं वेड ठेव,
स्वप्नें तर पाहतात सारी पण
ती पुरी करण्याची मनामध्ये
थोडी आस ठेव !!
सौज्यन्याचा गुण ठेव,
नम्रतेचा भाव ठेव,
अमृत प्यायला ज्ञानाचे
मन आपले गुरू चरणी
गहाण ठेव !!
अशक्याची पाठ सोड,
शक्याशी गाठ जोड,
जे जिकंलेत हरून
सुद्धा त्यांना आपल्या
मनाच्या आत ठेव !!
गाठण्यासाठी एक ध्येय
ठेव,जिंकण्यासाठी थोडं
ध्यैर्य ठेव,प्रयत्न पडलेच
तुझे कधी कमी
तर विचार करायला
थोडा वेळ ठेव !!
