Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Inspirational

3  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

वेळेचे महत्त्व

वेळेचे महत्त्व

1 min
11.9K


वेळ कधीच कोणासाठी थांबत नसतो 

वेळेला कोणी बांधून ठेवत नसतो 

जो वेळेनुसार नेहमी चालत नाही 

वेळही त्यांची वाट कधी पाहत नाही||


ज्याने वेळेचे महत्त्व समजले आहे 

तो दुसर्‍यावर राज्य करीत आहे 

वेळ वेळेनुसार फार बलशाली आहे 

ज्याच्यासोबत आहे तो भाग्यशाली आहे||


थांबून कोणाची वाट बघता तुम्ही 

वेळेचा काही तरी उपयोग करा तुम्ही 

वेळ तर नेहमी बदलतच राहते 

येणाऱ्याची ती आठवण देत राहते||


वेळ सांगते मी पुन्हा येणार नाही 

आलो तर मी तोच राहणार नाही 

म्हणून जीवन जगावं मस्तीत याच वेळेला 

ही वेळ पुढच्या वेळेपर्यंत थांबणार नाही||


आज वाईट वेळ आहे उद्या चांगली येणार 

वेळ ही बदलत राहते उद्याही बदलणार 

वेळ नका लावू ठरवायला की काय करणार 

नाहीतर वेळच ठरवेल की तुमचं काय करणार||


ज्याने वेळेचे भान नेहमी ठेवले 

त्याचे आयुष्य सोनेरी झाले 

होई सारे त्याच्या मनासारखे 

वेळही त्याला सुखाची हमी देत आले||


Rate this content
Log in