वेळ नाही
वेळ नाही
1 min
15.2K
कुणाला कुणा बोलण्या वेळ नाही।
अहो माणसे जोडणे खेळ नाही ।।
असे फाटलेलेच आयुष्य येथे ।
कशाला कशाचा तिथे मेळ नाही ।।
उन्हा पावसाच्या झळा सोसतांना ।
उभे संयमी राहणे खेळ नाही ।।
खडे मारताही फळे गोड देती ।
तरू सारखे सोसणे खेळ नाही ।।
जिने जीवनी कष्ट भरपूर केले ।
मुलाला तिला भेटण्या वेळ नाही ।।
नको "पंडिता" रे प्रपंचात राहू ।
सुखाने इथे राहणे खेळ नाही ।।
