वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा
1 min
16.1K
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा |
येरांनी वाहावा भार माथा ||
खादल्याची गोडी देखिल्यासी नाही |
भार धन वाही मजूरीचे ||
उत्पीतीपाळण संहाराचे निज |
जेणे नेले बीज त्याचे हाती ||
तुका म्हणे आम्हा सापडले मूळ |
आपणची फळ आले हाता ||
