वचनबद्ध
वचनबद्ध
1 min
290
खोडासारखी झाडाला देण्यासाथ
मुळांचा आधार तग धरते
वचनबद्ध आहे मी
माती पाण्याला जाब विचारते
लिहिले सटविणे कितीही
नशीब खराब तरी
वचनबद्ध आहे मी
खोडून रबरासारखे घासले जरी
कर तू चुका पूर्वग्रहाने
काळजात केल्या बंद
वचनबद्ध आहे मी
मेले तरी असतील त्या जेरबंद
मुर्दाड ही व्यवस्था
जितेपणावर बघ उठली
वचनबद्ध आहे मी
सरण जाळून चितेवर बसली
देवदासी खरी ती
देवळातच दंगल करते
वचनबद्ध आहे मी
फुल्यांच्या परड्या मोडते
