वैरी व्यसन
वैरी व्यसन

1 min

24.3K
एका नगरीत होते
त्याचे हसरे घरकूल
सुखी समाधानी तिथं
नवरा बायको आणि मूलं
अशी लागता संगत
रोज व्यसनाची पंगत
गडी रोज यायचा मग
घरी झिंगत झिंगत
रोज सिगारेट जाळी
आग संसारी लागली
आली मुलाबाळांवर
भीक मागायची पाळी
एक दिन असा आला
घात व्यसनाने केला
रोग भलताच असा
त्याच्या शरीरा लागला
क्षण क्षण वाटे मोठा
यातना होई कठीण
चूक उमगली आता
परी वेळ गेली निसटून
देह भोगतो यातना
दु:ख अनावर होई
संसार उद्ध्वस्त झाला
बघा व्यसनापायी