STORYMIRROR

Smita Phadatare

Others

3  

Smita Phadatare

Others

वाटतं आपण नेहमी..

वाटतं आपण नेहमी..

1 min
291

वाटतं आपण दररोज एक तरी

सत्कृत्य करावं

पण वाटतं आपणच

किती पुण्यवान व्हावं..

वाटतं आपण नेहमी प्रामाणिक रहावं

पण वाटतं आपणच

किती प्रामाणिक असायला हवं, खोटं

बोलायला हवं की कधीतर...

गरज असेल तेव्हा..

वाटतं आपण नेहमी समजुदारीने घ्यावं

पण वाटतं आपणच

किती समजुन घ्यायला हवं..

आपल्याला पण कोणीतरी

समजुन घ्यायला हवं..

वाटतं आपण नेहमी सर्वांसोबत असावं

पण वाटतं कोणी

आपल्यासोबत नसेल तेव्हा..

वाटतं आपण नेहमी

कोणाला दुखवायचं नाही

पण वाटतं आपल्याला

कोणी दुखवतो तेव्हा..

वाटतं आपण खूप काही सहन करायला हवं,तर का?

आपण मुलगी आहोत म्हणून..

पण वाटतं सगळं सहन

करण्याच्या पलीकडे

जायला लागतं तेव्हा..


Rate this content
Log in