वाटचाल स्ञी जन्माची...
वाटचाल स्ञी जन्माची...
1 min
28.4K
रुणझुण वाजवी पैंजण अंगणी
खेळे डाव भातुकलीचा बालपणी
स्वैर भटकंती, मन स्वच्छंदी
घरभर उमले हास्याची कळी
दिसामागुन दिस उडुनी जाती
संपादन करीसी तु ज्ञानाची शिदोरी
ज्ञान-तंञज्ञानाची करुनिया वारी
घेई तु यशाची ऊत्तुंग भरारी
बालपण सरता नवविश्वात रमुनी
तुजविण स्वामी तिन्ही जगाचा भिकारी
लेक ,भार्या ,स्नुषा नाना रुपे तुझी
तुच जगण्याला अर्थ नवा देसी
मनकवडी तुच, तुच मनमोहिनी
तरीही ऊमलण्याआधीच मिटसी
साऱ्यांना सदैव आनंद देसी
कसलीही तमा तु न करिसी
एकच सांगण म्हणुन साऱ्यांना
कळीला तुम्ही ऊमलु द्या.
जीवनात नवा श्वास भरण्या
लेकीला जगात येऊ द्या
लेकीला जगात येऊ द्या.
