वासुदेव
वासुदेव
पहाट पारी ऐकू आली
वसुदेवाची अभंगवाणी
जागी झाली आठवण त्याची
येता कानावर गोड गाणी
वेष आगळा वेगळा
अंगी बारा बंदीचा सदरा
मंजुळ घंटी बांधलेली
सदैव त्याच्या पदरा
तालात सुरात गाणी त्याची
मंद गार वाऱ्यासवे वाहती
गोकुळाची एक झलक
जणू पुन्हा डोळे पाहती
पशु पक्षांची भाषा याला
सहजी उमजे जन्मापासुनी
आशीर्वाद घेती माय भगिनी
दान झोळीत मनोभावे देऊनी
मृदू भाषेचा साज सजवूनी
भविष्य कथे तो मनापासूनी
जणू वाचा सिद्धी त्याला
ऐकती सारे कान टवकारूनी
समाधान त्याचे अन आमचे
घडे भेटीत एकदा वर्षांतूनी
तरीही वाटे आम्हाला तो
आला असावा स्वर्गातूनी
देणे घेणे रिवाज प्रथेचा
सामावण्या साठी आपल्यात
काही विशेष नसे तयात तरी
स्नेह दाटतो वसुदेवाच्या भेटीत....!!!
