STORYMIRROR

Smita Murali

Others

3  

Smita Murali

Others

वासुदेव आला

वासुदेव आला

1 min
1.6K


झुंजूमुंजू झालं आता

जागे झाले चराचर

पसरली प्रसन्नता

उठा सारे भराभर


करा गं सडा रांगोळी

वासुदेव हरी गात

कृष्णलीला वर्णत

स्वारी आली अंगणात


वासुदेव हा प्रभाती

गातो अभंग सुंदर

जावुनिया दारोदारी

करी भक्तीचा जागर


पायघोळ अंगरखा

नेसे त्यावर विजार

टाळ चिपळी हातात

करी हा लोकजागर


कवडीच्या गळी माळा

माथ्यावर शोभे टिळा

कृष्णभक्ती सांगणारा

भक्त हा असा गं भोळा


खेडोपाडी वावरतो

कधी गाठतो शहर

तिर्थस्थळी भेटणार

लोक प्रबोधनकार


आता भेट त्याची नाही

दिसे पात्र नाटकात

कलाकार हा पाहूनी

मन होई पुलकित


कला ही कलाकाराची

ठेवा जपी कलारुपी

जपणारा लोककल

कलाकार बहूरुपी




Rate this content
Log in