STORYMIRROR

काव्य रजनी

Inspirational

4  

काव्य रजनी

Inspirational

वाघ मित्र बाबा आमटे

वाघ मित्र बाबा आमटे

2 mins
22.8K

मुक्या प्राण्यांच्या तो भाषा

बोलतो निरसागास 

जनावराला ती साथ

चराचरी त्याची माया

लाभत असे जंगलात

त्याच वाघाने बाबांच्या

काळजाचा ठाव घ्यावा.......


प्रिय सखा त्यांचा वाघ 

त्यांच्या जागण्याने होती

रोज बाबांची पहाट

वाघ राजा तो जंगलाचा

काय त्याला कुठे उणे

सारी स्वप्न पूर्ण होती 

बाबांची वाघाजवळ मायेने..............


मुक्या भावनांना वाट

दिली आपल्या बाबांनी

करी वाघिणीला आई

लेकरू साद देई

बाबा मनाने हो थोर

अशी त्यांची ती नवलाई........


प्राण्यांना वाचवा

नको चिरफाड काही

वाघ आहे म्हणूनही 

आहे जंगलाची ख्याती

बाबा आमटे हो देव ते

म्हणती प्राण्यांना वाचवा

निसर्गाच्या त्या धनाला

कधी प्रेमाने निजवा........


लागताच वाघा ठेच

बाबा फुंकर ती घाली

दिला खायला तो दाना 

वाघ धन्यवाद करी 

वाघ तो कसा गोजिरवाणा

त्याचा देखणा रुबाब

बाबांशी तो करी मैत्री

अशी सोज्वळ बिनधास्त.........


आम्ही वाघ जंगलाचे

का आम्हाला मारता

बाबा आमुचे हो दाते 

आम्ही त्यांचेही लाडके


आम्हा मारून विकता

आमच्या अंगाची कातडी

नखे तोडून आमुचे 

स्वार्थ तुमचा हो साधता


बाबा आमचे हो धनी

देती आम्हाला दिलासा

जीवापाड प्रेम करी

आम्ही नाही गैर कोणी


देह झिजूनी घालवी

आमच्या अन्नाची तहान

आमच्या छोट्या बछड्यांना 

लावी जीव तो महान.....


गेला सूर्य अस्तापर

केली स्वतःची भरणी 

तुम्ही माणसे हो स्वार्थी

झाली आमची नालस्ती


दिली बाबांनी ती साथ

झाली आमची जाणीव

आईविना हो त्या गोड

छाव्याला त्या वाढविला


आम्ही डरकाळ्या फोडू

कुणी आले आम्हाकडे

आमच्या बाबांच्या पुढे

आम्हा सारे जग वावडे......


बाबा आमटे हो छान 

करी निसर्गाची किमया

लहान मोठे योगदान दिले

त्यांनीच कितीदा


वाघ जात ती राजाची

कसा दिसतो तो शोभून

त्याच्या नजरेने होते

शंभु बाळाचे दर्शन

 

वाघ डरकाळी फोडी

सारे भांबावून जाई

परी रोजचे तरीही

रोज नव्याने तो पाही


अशी वाघाची ती जात

करू नका तिचा अंत

त्यांच्या रक्तातले बीज

भिने मराठ्यांच्या अंगात.....


वाघ डरकाळी फोडी

भीती वाटते लोकांना

तरी मारती ती लोक

कशी मुक्या जीवांना....


करतो काळही तो घात

येते प्रत्येकाची वेळ

प्राणी, पक्षी, वन्य जीव 

जाती मोकळ्या श्वासात


बाबा लावती तो जीव

आम्हा प्राणीमात्रावर

कसे फेडू त्यांचे पांग

माझ्या जिवंत जिवावर


करतो पक्षी सारे गोळा

भरी प्राण्यांचा तो मेळा

माझा बाबा साधा भोळा

लावी मायेचा जिव्हाळा....


बाबा घेताच कवेत 

जाई हरपून भान

त्यांच्या मिठीने भरती

आमची भूक नी तहान


आम्ही आजारी पडतो

सेवा तत्पर करतो

आम्हा प्राणीमात्रांचाही

जीव त्याच्यात जडतो.........


वाघ चाले तो डौलाने 

करी कसा गाजावाजा

बाबा आमचे म्हणती

जरा बघा माझा राजा....


दिवा मिन चाले

वाघ डोळे ते वाटारे

काळ्याभोर जंगलात 

कसा काजवा तो जळे.......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational