STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Others

3  

Sheshrao Yelekar

Others

वादळ

वादळ

1 min
14.2K


मनी सुटला वादळ

कसं जगावं जीवन

अपेक्षांच्या ओझ्याखाली

पत्कारावं मरण


नाही नौकरी धंदा

रिकाम टेकळे हात

खाली दिमाखाला

नैराश्याची साथ


मागणाऱ्या हातावर

भ्रष्टचार जुगलबंदी

इमानदार मार्गावर

मोठी आर्थिक मंदी


माणसाच्या कळपावर

लालचेची गहरी छाप

गोड मलाई खाणारे

खुर्चीधारी विषारी साप


माणूस म्हणून जगताना

वाटते सर्वास लाज

हैवानियत ज्यांच्या पासी

तो चमकता सरताज


Rate this content
Log in