STORYMIRROR

Renuka D. Deshpande

Others

3  

Renuka D. Deshpande

Others

उत्पत्ती छत्रीची

उत्पत्ती छत्रीची

1 min
34

कशी झाली असावी उत्पत्ती छत्रीची ...

उत्सुकता फार वाढली माझ्या मनाची...

तेव्हा, तेव्हाच अचानक नजरेस पडले..

नैसर्गिक छत्रीचे दर्शन हो मला घडले..

जमिनीचा उत म्हणावा की देवाची अद्भुत लिला...

काय नाव द्यावे हो देवाच्या सुंदर निर्मितीला..

मशरूम म्हणतात लोक ज्याला अथवा छत्री...

साऱ्यांचेच मन आकर्षित करते याची खात्री ..

कल्पनेच्या जगात जसे बेडूक वापरतात या नैसर्गिक छत्रीला पावसापासून वाचण्यासाठी..

त्यानेच हो प्रेरित केले असावे मानवाला प्रत्यक्षात कृत्रिम छत्री निर्माण करण्यासाठी..

पावसापासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत उपयोगी अशी ही छत्री...

कोणी ही मानव भिजणार नाही याची देते सदैव खात्री...

एक संरक्षक, एक मित्र आहे छत्री मानवाची..

कुणीही नाकारू शकत नाही हो महती आपल्या छत्रीची..


Rate this content
Log in